करुण नायरने संधीचं सोनं केलं, गोलंदाजांची धुलाई करत इंग्लंडमध्ये ठोकलं द्विशतक

“प्रिय क्रिकेट मला एक संधी दे,” असं म्हणत साऱ्या क्रिकेट विश्वाच लक्ष वेधून घेणाऱ्या करुण नायरने मिळालेल्या संधीच सोनं करत इंग्लंड लायन्सविरुद्ध द्विशतक ठोकलं आहे. इंडिया-A आणि इंग्लंड लायन्स यांच्यामध्ये पहिला अनधिकृत कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात करुण नायर व्यतिरिक्त सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांनी सुद्धा गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्यामुळे पहिल्या डावात इंडिया A ने सर्व गडी बाद 557 धावांपर्यंत मजल मारली.

सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वाल (24) आणि अभिमन्यू इश्वरन (8) यांनी संघाला चांगली सुरुवात करुण दिली नाही. दोघेही झटपट बाद झाल्यामुळे संघ काहीसा अडचणीत आला होता. परंतु करुण नायर आणि सरफराज खान यांनी सर्व सुत्र आपल्या हाती घेत संघाचा डाव सावरला. करुण नायरने 281 चेंडूंचा सामना करत 26 चौकार आणि 1 षटकार ठोकत 204 धावा केल्या. तसेच सरफराज खाननेही 92 धावांची खेळी केली. अवघ्या आठ धावांनी त्याचे शतक हुकले. त्यानतंर ध्रुव जुरेलनेही 94 धावांची खेळी केली. मधल्या फळीतील फलंदाजांनी डाव सावरल्यामुळे संघाला सर्वगडी बाद 557 धावांपर्यंत मजल मारता आली.

IPL 2025 – रोहित फॉर्मात आलाय, मुंबईच चॅम्पियन होणार…; इंग्लंडच्या माजी खेळाडूच भाकीत

करुण नायर फॉर्मात असल्यामुळे टीम इंडियाच्या गोठात आनंदाचे वातावरण आहे. इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्याची टीम इंडियाच्या मुख्य संघात निवड करण्यात आली आहे. द्विशतक ठोकत त्याने आपली दावेदारीही सिद्ध केली आहे. देशांतर्गत, त्यानंतर आयपीएल आणि आता इंग्लंड लायन्सविरुद्ध करुण नायरच्या खेळात सातत्य पाहयला मिळत आहे. याच सातत्याच्या आणि मेहनतीच्या जोरावर तब्बल 8 वर्षांनी त्याचे टीम इंडियात पुनरागमन झालं आहे.