
राफेल या लढाऊ विमानाची सुरक्षा व ताकद वाढवण्यास हिंदुस्थान इस्त्राईलकडून डेकॉय सिस्टिम घेणार आहे. क्षेपणास्त्रापासून ही सिस्टम राफेलचे संरक्षण करेल.
एक्स गार्ड फायबर ऑप्टिक टोन्ह डेकॉय सिस्टमची ऑर्डर हिंदुस्थानने इस्त्राईला दिली आहे. या सिस्टममुळे शत्रूच्या भागातही लढाऊ राफेल विमानाला धोका होणार नाही. महत्त्वाचे म्हणजे डेकॉय सिस्टम राफेल विमानांना लावून त्याची चाचणीही करण्यात आल्याचे खात्रिलायक वृत्त आहे.
दिशाभूल करणारी यंत्रणा
डेकॉयला विमानाच्या इलेक्ट्रॉनिक वारफेयर सिस्टमसोबत जोडलेले असते. ही प्रणाली शत्रूच्या क्षेपणास्त्राची फसवणूक करण्याचे काम करते. ही प्रणाली एका पॉडमध्ये लावलेली असते. मिशनसाठी त्याचा खास वापर केला जातो. फायबर ऑप्टिक लाइनच्या माध्यमातून ही प्रणाली विमानाला जोडलेली असते. जेव्हा शूत्र क्षेपणास्त्राने विमानावर हल्ला करतो, तेव्हा ही सिस्टीम त्याला आपल्याकडे ओढून घेते. क्षेपणास्त्र त्या सिस्टीमला विमान समजून हल्ला करतो. त्यामुळे विमानाला काहीच होत नाही.