Pahalgam Terror Attack हिंदुस्थानचा मोठा निर्णय, पाकिस्तानी विमानांसाठी एअरस्पेस केला बंद

पहलगाम हल्ल्याच्या एक आठवड्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमधून येणाऱ्या विमानांसाठी हिंदुस्थानचे एअरस्पेस बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही पाकिस्तानी विमानाला हिंदुस्थानच्या हवाई हद्दीत प्रवेश करता येणार नाही. 30 एप्रिल ते 23 मे पर्यंत ही बंदी राहणार आहे.

पहलगाम हल्ल्य़ानंतर हिंदुस्थानने पाकिस्ताबाबत कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. सर्वप्रथम हिंदुस्थानने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द करत पाकिस्तानची पाणी कोंडी केली आहे. तसंच हिंदुस्थानात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करत त्यांना पाकिस्तानात परत पाठवण्यात येत आहे. तसेच हिंदुस्थानने उरी धरणातून जादा पाणी सोडल्यानं झेलम नदीला पूर आला असून पाकव्याप्त कश्मिरातील गावांमध्ये हाहाकार माजला आहे.