
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने या घटनेत पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे मागितले. तसेच त्याने या हल्ल्यासाठी हिंदुस्थानी लष्कराला जबाबदार धरले. त्यानंतर आता हिंदुस्थान सरकारने शाहिद आफ्रिदीला दणका देत त्याच्या युट्युब चॅनेलवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या युट्युब चॅनेलवर बंदी घातली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीची प्रतिक्रिया आली. या पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी आफ्रिदीने भारतीय सैन्याला जबाबदार धरले आहे. त्यांनी पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावे मागितले आणि घटनेच्या मीडिया कव्हरेजवर टीका केली. एवढेच नाही तर, कोणत्याही पुराव्याशिवाय पाकिस्तानवर आरोप करणाऱ्या काही माजी हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनाही आफ्रिदीने लक्ष्य केले होते. शाहिद आफ्रिदीने सामा टीव्हीवर बोलताना, हिंदुस्थानी सैन्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरले होते. हिंदुस्थानविरुद्ध विष ओकण्याची त्याची ही पहिलीच वेळ नाहीये. आफ्रिदीला संधी मिळते तेव्हा तो हिंदुस्थानविरोधी विधाने कायम करत असतो.