महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मतांच्या चोरीचा प्रयत्न, संसदेबाहेर इंडिया आघाडीचे आंदोलन

महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये नागरिकांच्या मतांची चोरी करून लोकशाहीचा गळा घोटण्याच्या प्रयत्नाला विरोध करण्यासाठी इंडिया आघाडीने संसदेच्या प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन केले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी, यांच्यासह इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना धोका पोहोचवण्याचा आणि निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.