चीन दगाबाजच! शांततापूर्ण चर्चेचे नाटक सुरू ठेवताना ‘एलएसी’वर 30 टक्के सैन्य वाढविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्व लडाखच्या सीमेवरुन सैन्य माघारीची तयारी चीनने दर्शविली असली तरी लाल माकडांचे हे नाटक असून, दगाबाजी कायम असल्याचे वृत्त आहे. प्रत्येक ताबारेषेजवळ (एलएसी) 15 जूनच्या हिंसक संघर्षानंतर आणखी 30 टक्के सैनिक तैनात केल्याचे धक्कादायक वृत्त आहे. तसेच गलवान खोरे आणि परिसरात चीनची घुसखोरी कायम आहे. दौलतबेग ओलडी, देपसांग येथेही मोठी घुसखोरी करण्याच्या तयारीत चीन असल्याचे समजते.

15 जूनच्या हिंसक संघर्षानंतर चीनने तब्बल 30 टक्के सैन्य वाढविले आहे.  उत्तर लडाखमधील गलवान खोरे ते मध्य लडाख सीमेवरील हॉट प्रींग, पॉगोंग टीएसओ तसेच दक्षिण लडाखच्या देपसांग आणि चुमार या सीमाभागात 30 टक्के सैन्य वाढ करतानाच रणगाडे, सैन्याचे वाहने मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसाठा जमा केला आहे. देपसांग, दौलतबेग ओलडीसह या परिसरात चीन घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.  z गलवान रिव्हर व्हॅली येथे हिंदुस्थानी लष्कराचा कोणताही कॅम्प किंवा चौकी नाही. मात्र,  पीपी 14 येथे हिंदुस्थानच्या हद्दीत एक किलोमीटर घुसखोरी करुन चीनी सैन्याने उभारलेला कॅम्प तेथे आहे.