लाल माकडांची खुमखुमी कायम, लडाखमध्ये चिन्यांच्या घुसखोरीचा डाव उधळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनला युद्धज्वराने झपाटले आहे. लडाख सीमेवर पँगाँग तलाव परिसरात चिनी लष्कराने गेल्या दोन दिवसांत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र हिंदुस्थानी लष्कराने चिन्यांचा डाव उधळून लावला. या भागात दोन्ही लष्करामध्ये जबरदस्त झटापट झाली. दरम्यान, चीनने सीमेवर अत्यंत मोक्याच्या ठिकाणी क्षेपणास्त्र तैनात केले असून काही भागात जे-20 फायटर विमानेही आणली आहे. चीनच्या युद्धखोरीमुळे लडाख सीमेवर पुन्हा प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

जून महिन्यात चिनी लष्कराने गलवान खोऱ्यात घुसखोरी केली होती. यामुळे निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी उभय देशात चर्चा सुरू असतानाच चिनी लष्कराने पुन्हा आगळिक केली. हिंदुस्थानी लष्कराने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. गलवान खोऱ्यात झालेल्या या हिंसाचारात हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाले. चीनने आपल्या ठार झालेल्या सैनिकांची संख्या अद्यापही जाहीर केलेली नाही. त्यानंतर दोन्ही देशांनी प्रत्यक्ष सीमारेषेवरून अडीच किमी मागे जाण्याचा निर्णय घेतला.

एक पाऊलही पुढे सरकू दिले नाही

लडाख सीमेवर शांतता प्रस्थापित होत असतानाच 29 क 30 ऑगस्ट रोजी चिनी लष्कराने पँगाँग तलाक परिसरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. चिनी लष्कराचा 500 सैनिकांचा ताफा हिंदुस्थानी भूभागात घुसला. मात्र सजग असलेल्या हिंदुस्थानी लष्कराने चिनी लष्कराला जागेवरच थोपवले. आक्रमक चिनी सैनिकांनी घुसण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु हिंदुस्थानी बहाद्दर जवानांनी त्यांना एक पाऊलही पुढे सरकू दिले नाही. याकेळी दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये जबरदस्त झटापट झाली. लष्कराचे प्रवक्ता कर्नल अमन आनंद यांनी चिनी लष्कराने घुसखोरी केल्याचा स्पष्ट आरोप केला. सीमेवरील यथास्थिती बदलण्याचा चिनी लष्कराने प्रयत्न केल्याचेही ते म्हणाले.

फायटर किमाने, क्षेपणास्त्र आणले

पँगाँग तलाक परिसरातील घुसखोरीचा डाव उधळला जाताच चीनने दहशत निर्माण करण्यासाठी लडाख सीमेवरील मोक्याच्या चौक्यांवर जे-20 ही फायटर विमाने तैनात केली. त्याचबरोबर सिंधू, ब्रह्मपूत्रा, सतलज आणि कर्नाली या नद्यांच्या उगम ज्या डोंगररांगांमध्ये होतो त्या अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र आणून ठेवले आहे. हा सर्व परिसर कैलाश मानसरोवर म्हणून ओळखला जातो.

देशाला सीमेवरील वास्तव सांगा

चीनच्या लडाख सीमेवरील घुसखोरीवरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. सीमेकरील वास्तव पंतप्रधानांनी देशाला सांगितले पाहिजे असे काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला म्हणाले. देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला होत आहे. आमच्या इलाक्यात घुसखोरी होत आहे. पंतप्रधान चीनवर डोळे कधी वटारणार असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

तीन ठिकाणी चिनी लष्कर ठाण मांडून

उभय देशांच्या लष्करी क सरकारी पातळीवर झालेल्या चर्चेत प्रत्यक्ष सीमारेषेवरून लष्कर अडीच किमी मागे घेण्याचा निर्णय झाला होता. चीनने काही भागातून आपले लष्कर मागे घेतले. मात्र फिंगर एरिया, देप्सांग आणि गोगरा या भागात चिनी लष्कर अजूनही ठाण मांडून बसलेले आहे. एवढेच नाही तर या भागात चिनी लष्कराने बंकरही बनवले आहेत.