देशात कोरोना रुग्ण संख्येने गाठला 62 लाखांचा टप्पा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने 62 लाखांचा टप्पा गाठला असून गेल्या चोवीस तासात 80 हजार 472 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 179 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 62 लाख 25 हजार 764 च्या घरात गेली आहे. यात 9 लाख 40 हजार 441 ऑक्टिव्ह केसेसचा समावेश आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे 51 लाख 87 हजार 826 जणांनी कोरोनावर मात केली आहे आणि 97 हजार 497 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिली.

दरम्म्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थान कोरोनाच्या बाबतीत खरी आकडेवारी लपवत असल्याचा आरोप केला आहे. डेमोव्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्या नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय चर्चेत बोलताना ट्रम्प यांनी वरील आरोप केला आहे.