
देशातील अनेक राज्यांमध्ये कोविड रुग्णांच्या दैनंदिन संख्येत वाढ नोंदली जात आहे. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात या सहा राज्यांमध्ये गेल्या 24 तासात नवीन रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
गेल्या 24 तासांत 15,510 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 8,293 रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल केरळमध्ये 3,254 आणि पंजाबमध्ये 579 नवीन रुग्ण आढळले आहेत.
केंद्र सरकार जिथे सक्रिय रुग्णांची संख्या जास्त आहे आणि दररोज नवीन कोविड रुग्णसंख्येत वाढ होत आहे अशा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी नियमित संपर्क साधत आहे. कोविड 19 चा प्रसार रोखण्यासाठी सतत कठोर दक्षता बाळगण्याचा सल्ला राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आला आहे.
आज हिंदुस्थानात एकूण सक्रिय रुग्णसंख्या 1,68,627 इतकी आहे. हिंदुस्थानातील सध्याच्या सक्रिय रुग्णसंख्येचे प्रमाण आता हिंदुस्थानच्या एकूण सकारात्मक रुग्णसंख्येच्या 1.52 टक्के आहे. एकट्या महाराष्ट्रात एकूण सक्रिय रुग्णांपैकी 46.39 टक्के रुग्ण आहेत. 10,000 हून अधिक सक्रिय रुग्ण असलेली केरळ आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये आहेत.

























































