कोरोनामुक्तीचा निर्धार; देशभर एका दिवसात विक्रमी 5 लाख 28 हजार चाचण्या

358

हिंदुस्थानातून कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्याचा दृढनिश्चय केंद्र सरकारने केला आहे. कोरोना झालेल्या रुग्णांचे वेळीच निदान आणि उपचार करण्यासाठी सरकारने चाचण्यांचा टक्का वाढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर दिवशी 10 लाख कोरोना चाचण्यांचे उद्दिष्ट सोमवारी जाहीर केले. याच दिवशी देशभरात विक्रमी 5 लाख 28 हजार नमुने तपासण्यात आले.

कोरोना विषाणूला संपकण्यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. चाचण्यांचे वाढीव प्रमाण हादेखील यातीलच एक प्रभावी उपाय ठरत आहे. कोरोनाचे वेळीच निदान झाल्याने कोरोनाग्रस्तांना आवश्यक ते उपचार घेऊन कोरोनावर मात करणे शक्य होत आहे. सरकारच्या याच प्रयत्नांमुळे देशभरात कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्या 9 लाख 52 हजार 744 कर गेली आहे. विविध राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयामुळे देशाचा कोरोना लढा यशस्कीततेच्या मार्गावर आहे, असा दावा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंगळवारी केला.

कोरोनाचे 47,704 नवे रुग्ण; आणखी 654 जणांचा मृत्यू

देशात मंगळवारी कोरोनाचे 47,704 रुग्ण वाढले, तर 24 तासांत 654 जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 14 लाख 83 हजार 157 कर गेली आहे. यात 4 लाख 96 हजार 988 अॅक्टिव्हृ रुग्ण आहेत. तसेच कोरोनाबळींची एकूण संख्या 33,425 झाली आहे. रुग्ण आणि बळींची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुधारत आहे. तसेच इतर देशांच्या तुलनेत मृत्यूदर सर्कात कमी म्हणजेच 2.28 टक्क्यांवर खाली आल्याने दिलासा मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या