
कोरोनाच्या भयंकर संकटाचा सामना करणाऱया हिंदुस्थानच्या मदतीसाठी जगभरातील अनेक देश सरसावले आहेत. मदतीचा हात देऊ केला आहे. अमेरिकेतील टॉप 40 पंपन्यांच्या सीईओंनी टास्क फोर्स स्थापन केला असून, लवकरच 20 हजार ऑक्सिजन पंटेनर्स हिंदुस्थानला देणार आहेत. फ्रान्स, जर्मनी, इस्त्राईल, आयर्लंड, भूतान आदी देशांकडूनही मदत मिळणार आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेत हिंदुस्थानात हाहाकार उडाला असून, दररोज तीन लाखांवर रुग्ण आढळत आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिविर इंजेक्शनची कमतरता यामुळे अनेक रुग्णांचे प्राण जात आहेत. या भयंकर परिस्थितीत अमेरिकेसह अनेक देशांकडून हिंदुस्थानला मदत केली जाणार आहे.
कोणाकडून मिळणार मदत?
यूएस-इंडिया बिझनेस कॉन्सिल आणि यूएस-इंडिया स्ट्रेटेजिक अॅण्ड पार्टनरशिप पह्रमची बैठक पार पडली. 40 सीईओ एकत्र आले. 20 हजार ऑक्सिजन पंटेनर्स हिंदुस्थानला देण्यात येणार आहेत, अशी माहिती डेलॉइटचे सीईओ पुनीत रंजन यांनी सांगितले.
या सीईओंनी टास्कफोर्स स्थापन केला असून, वैद्यकीय उपकरणे, लस, इतर वस्तुंचाही पुरवठा मदतीच्या स्वरूपात केला जाणार आहे.
पंतप्रधान मोदी यांची जो बायडन यांच्याशी चर्चा
कोरोनाच्या स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी पह्नवर चर्चा केली. ट्विट करून पंतप्रधान मोदी यांनी ही माहिती दिली आहे. बायडन यांच्याबरोबर चर्चा सकारात्मक झाली. अमेरिकेकडून हिंदुस्थानला देण्यात आलेल्या सहकार्याबद्दल बायडन यांचे आभार मानले. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी हिंदुस्थानकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनाबाबतही चर्चा झाली, अशी माहिती मोदी यांनी दिली.
अमेरिकेतील 40 सीईओंचा टास्क फोर्स; 20 हजार ऑक्सिजन कंटेनर्स देणार
महासत्ता अमेरिकेत अनेक पंपन्यांचे सीईओ पद हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांच्या हातात आहे. विशेषतः आयटी सेक्टरमध्ये अनेक हिंदुस्थानी आहेत. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी हिंदुस्थानसाठी 135 कोटींची मदत जाहीर केली आहे. मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नाडेला यांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
फ्रान्स सरकारकडून ऑक्सिजन जनरेटर्स, लिक्विड ऑक्सिजन कंटेनर्स, व्हेंटिलेटर्स दिले जाणार आहेत. तसेच जर्मनी, ब्रिटन, सिंगापूर, आयर्लंड, इस्त्रायल, भूतानही ऑक्सिजनसह इतर वैद्यकीय मदत देणार आहे.


























































