हिंदुस्थानातील कुपोषणाबाबत सर्वेक्षण

कोविड-१९ महामारीमुळे मजूर, गरजू लोकांना प्रतिकूल स्थितीचा सामना करावा लागत आहे. २०२० ग्लोाबल न्यूचट्रिशनच्या अहवालानुसार हिंदुस्थानात कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. मात्र हिंदुस्थानने कुपोषणासाऱख्या अशा समस्यांतचा सामना करण्या्साठी काही प्रगती करण्यात आली आहे आणि देशाने सर्वात वंचितांपर्यंत पोहोचण्याचा मनसुबा ठेवत नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत.

हिंदुस्थानात लहान व किशोरवयीन मुलांमधील कमी वजनाचे प्रमाण कमी करण्या मध्यें काही प्रमाणात यश मिळाले आहे. वर्ष २००० ते २०१६ दरम्यामन हे प्रमाण मुलांसाठी ६६.० टक्यां वरून ५८.१ टक्क्यांपर्यंत, तर मुलींसाठी ५४.२ टक्क्यांवरून ५०.१ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. पण हे प्रमाण आशिया प्रांतामधील सरासरी मुलांसाठी ३५.६ टक्के आणि मुलींसाठी ३१.८ टक्के इतक्या प्रमाणाच्‍या तुलनेत खूपच जास्त आहे. तसेच ५ वर्षांखालील ३७.९ टक्के मुले कुपाषित आहेत आणि २०.८ टक्के मुले अशक्ते आहेत. तुलनेत आशियामधील सरासरी अनुक्रमे २२.७ टक्के आणि ९.४ टक्के आहे. आहार-संबंधित आजार कायमस्वरूपी समस्या राहिली आहे, प्रजनन काळात गरोदर पणात दोनपैकी एका महिलेला अॅनेमियाचा त्रास होत आहे. दुसरीकडे वजन कमी होणे व लठ्ठपणाचे प्रमाण वाढतच आहे. याचा अनेक प्रौढांवर परिणाम होत आहे, ज्या मध्ये २१.६ टक्केा महिला आणि १७.८ टक्केत पुरूष आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या