चार पाकिस्तानी जवानांचा खात्मा,हिंदुस्थानी लष्कराचे पाकडय़ांना चोख प्रत्युत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुरुवारी रात्री प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून हिंदुस्थानी चौक्यांवर गोळीबार आणि हातबॉम्बचा वर्षाव करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांना हिंदुस्थानी लष्कराने चांगलाच धडा शिकवला. पाकडय़ांच्या युद्धबंदी मोडण्याच्या आगळिकीनंतर हिंदुस्थानी जवानांनी पाकिस्तानी चौक्यांवर तुफानी गोळीबाराचा भडीमार करीत पाकिस्तानच्या चार सैनिकांना कंठस्नान घातले. पाकिस्तानच्या गोळीबारात हिंदुस्थानचा एक जवान शहीद झाला.

गुरुवारी रात्री पाकिस्तानी रेंजर्सनी पूंछ-राजौरी सेक्टरजवळील सीमावर्ती हिंदुस्थानी चौक्यांवर अचानक गोळीबार करीत तोफगोळे डागले आणि हातबॉम्बही फेकले. पाकडय़ांच्या या युद्धबंदी मोडण्याच्या कृतीला हिंदुस्थानी जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. हिंदुस्थानच्या हल्ल्यात पाकिस्तानी चौक्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.