India Pakistan War- जम्मूच्या पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानचा गोळीबार सुरु

पुन्हा एकदा हिंदुस्थानच्या सीमावर्ती भागावर पाकिस्तानने हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आलेला असून, पंजाब पठाणकोट मध्येही ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. पाकच्या ड्रोन हल्ल्यांना हिंदुस्थानी सैन्याने प्रत्युत्तर देत त्यांचे ड्रोन पाडले आहे. जम्मूतल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. पठाणकोट, पूंछमध्ये सतत सायरन वाजवले जात आहेत. पाकच्या हल्ल्याच्या भीतीने जम्मू शहरामध्ये सायरन वाजवले जात आहेत.

उरीमध्ये सामान्य नागरिकांवर पाककडून गोळीबार सुरु करण्यात आलेला आहे. जम्मू कश्मिरच्या मुख्यमंत्र्यांनी लोकांना घरात राहण्याचे आवाहन केले. कुपवाडामध्येही पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात येत आहे. जम्मू तसेच श्रीनगरमधील अनेक भागांमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आलेला आहे.

सध्याच्या घडीला हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील एकूणच तणावाची स्थिती पाहता विमानसेवा बंद करण्यात आलेल्या आहेत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हिंदुस्थानी सशस्त्र दलांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून बुधवारी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात 26 हून अधिक लोक मारले गेले होते.

 

सविस्तर वृत्त लवकरच..