
सध्याच्या घडीला हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या, तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशामध्ये सर्व महत्त्वाच्या ठिकाणांना हायअलर्ट लागू करण्यात आलेला आहे. ऑपरेशन सिंदूर च्या पाश्वभूमीवर पाकिस्तानी सैन्य हिंदूस्थानच्या नागरी वस्त्यांवर हल्ले चढवत आहे. या हल्ल्यांमध्ये रॉकेट लाँचर्स, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला जात असल्याने, मुंबईच्या किनारपट्टीवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.
हिंदुस्थानी सैन्याने गुरुवारी रात्रभरात पाकिस्तानला रात्रभर मोठा दणका दिला आहे. थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत धडक मारत जोरदार ड्रोन आणि हवाई हल्ले केले. हिंदुस्थान-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा वाढवली आहे. समुद्रकिनारी फिरायला आलेल्या, किनाऱ्यावर बसलेल्या लोकांना त्वरित समुद्रकिनाऱ्यावरून उठून जाण्यास सांगितले जात आहे. तसेच सर्वांना सुरक्षेचं कारण देऊन समुद्रकिनाऱ्यापासून दूर जाण्यास सांगितलं जात आहे.