
>> विजय परदेशी
गेल्या अकरा वर्षांत मोदी सरकारने जर काही केले असेल तर ते फक्त खासगीकरण! टपाल खात्याची एकेक सेवाही महाग करून मोदी सरकारने या खात्यालाही घरघर लावली आहे. 1 ऑगस्टपासून सर्वसामान्यांना परवडणारी रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात येत आहे. रजिस्टर्ड पोस्टऐवजी सर्वसामान्यांना स्पीडपोस्टचा पर्याय उपलब्ध असून, त्यासाठी पंधरा रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत.
लॉर्ड क्लाईव्हने 1766 मध्ये हिंदुस्थानात टपाल सेवा सुरू केली. लॉर्ड वॉर्न हेस्टिंग्जने या सेवेत सुधारणा केली. हेस्टिंग्जनेच 1774 मध्ये कोलकात्यात जनरल पोस्ट ऑफिस सुरू केले. ईस्ट इंडिया कंपनीनंतर ब्रिटिश महाराणीकडे टपाल सेवेचा कारभार आला. लॉर्ड डलहौसीने टपाल सेवेचे जाळे नंतर संपूर्ण हिंदुस्थानात पसरवले. हळूहळू टपाल सेवा पडली. पोस्टमास्तर, पोस्टमन हे आपलेसे झाले. सुरुवातीला फक्त पत्र घेऊन येणारा पोस्टमन नंतर तार घेऊन येऊ लागला. शहरात कामासाठी गेलेल्या मुलाने पाठवलेल्या मनिऑर्डरी घेऊन येणारा पोस्टमन सर्वांनी पाहिलाय. काळाच्या ओघात टपाल सेवेने कात टाकली. अनेक नव्या सेवा टपाल खात्याने सुरू केल्या. त्यापैकी रजिस्टर्ड पोस्ट ही एक सेवा.
रजिस्टर्ड पोस्ट. नोंदणीकृत पत्र. काळ्या शाईत टाकलेले लफ्फेदार नाव. रजिस्टर्ड पोस्ट आली की समजायचं काही तरी मोठ्ठ झालंय ! परीक्षेचा निकाल, कोर्टाची नोटीस, सरकारी नोकरीचा कॉल… कधीतरी वाईट खबरही. पोस्टमनही हे पत्र देताना मोठ्या तोऱ्यात देत असे.
रजिस्टर्ड पोस्टचा खर्च म्हणजे आता बंद होईपर्यंत फक्त 26 रुपये! पोहोच पावती लागली तर 30 रुपये. टपाल खात्याने ही रजिस्टर्ड सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. टपाल सेवा अधिक सुलभ करण्याच्या नावाखाली 31 जुलै रोजी टपाल खात्याने शेवटचे रजिस्टर्ड पोस्ट केले. आता सर्वसामान्यांना स्पीड पोस्टचा मोजावे लागणार आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधून दिवसभरात साधारण चार हजार रजिस्टर्ड पर्याय उपलब्ध आहे. आता लोकांना स्पीड पोस्ट करावे लागणार किंवा त्यासाठी खासगी कुरिअर सेवेकडे वळावे लागणार आहे.