
हिंदुस्थानात लवकरच फ्लॉइंग कार लाँच होणार असेच दिसतेय. चेन्नई येथील विनता एरोमोबिलिटी ही कंपनी हायब्रिड फ्लॉइंग कार तयार करतेय. नुकताच या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला.
फ्लॉइंग कारमधून माणसे आणि मोठय़ा वजनाचे सामान ने-आण करता येईल. वैद्यकीय आत्पकालीन परिस्थितीत ती उपयुक्त ठरेल. उडत्या कारचे वजन 1100 किलो असून 1300 किलो वजन घेऊन कार उडू शकते. हायब्रीड कार इंधन आणि बॅटरी अशा दोन्हीवर चालेल. ती व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग करू शकते. त्यामुळे तिला विमानाप्रमाणे धावपट्टीची गरज लागत नाही. फ्लॉइंग कार ताशी 120 किमी वेगाने उडू शकते. सध्या कार दोन प्रवाशांसाठी डिझाईन करण्यात आली आहे. ती 3 हजार फूट उंचीवर उडण्यास सक्षम आहे. येत्या 5 ऑक्टोबर रोजी लंडनमधील हेलिटेक प्रदर्शनात कार लाँचिंग होण्याची शक्यता आहे.


























































