IND VS ENG 1st TEST: पहिल्या दिवसअखेर इंग्लंड ९ बाद २८५

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून सुरू झाला आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीला आमंत्रीत केले आहे. टीम इंडियाने लोकेश, राहुल, शिखर धवन आणि मुरली विजय या तीन स्पेशलिस्ट सलामीवीरांना संधी दिली असून पुजाराला बाहेर बसवले आहे. अश्विनच्या रुपाने एकमात्र फिरकी गोलंदाज टीम इंडियाच्या ताफ्यात आहे.

लाईव्ह स्कोर –

  • हिंदुस्थानकडून पहिल्या दिवशी अश्विनचे चार बळी, शमीला २, इशांत शर्मा आणि उमेश यादवला प्रत्येकी १ बळी
  • पहिल्या दिवसाचा खेळ संपला, दिवसअखेर इंग्लंडच्या ९ बाद २८५ धावा

  • इंग्लंडच्या ९ बाद २८३ धावा, तिनशेच्या आत गुंडाळण्याची हिंदुस्थानचा संधी
  • स्टुअर्ट ब्रॉड शुन्यावर बाद
  • इंग्लंडला नववा धक्का, अश्विनचा बळींचा चौकार

  • इशांत शर्माने रशिदला १३ धावांवर केले बाद
  • इंग्लंडला आठवा धक्का, रशिद बाद

  • अश्विनने स्टोक्सला केले बाद, सामन्यातील तिसरा बळी
  • इंग्लंडला सातवा धक्का, स्टोक्स २१ धावांवर बाद

  • आर. अश्विनचा सामन्यात दुसरा बळी, इंग्लंड ६ बाद २२४
  • इंग्लंडला सहावा धक्का, बटलर शुन्यावर बाद

  • इंग्लंडला पाचवा धक्का, बेअरस्टो ७० धावांवर बाद, उमेश यादवने घेतला बळी

  • विराट कोहलीच्या अचूक थ्रोमुळे शतकाकडे वाटचाल करणारा रुट ८० धावांवर बाद
  • इंग्लंडला चौथा धक्का, धोकादायक रुट बाद. २१६ धावांवर चौथा धक्का
  • बेअरस्टोचे अर्धशकक, रुटची शतकाकडे वाटचाल

  • इंग्लंडच्या २०० धावा पूर्ण
  • चहापानापर्यंत इंग्लंडच्या ३ बाद १६३ धावा

  • इंग्लंडच्या दीडशे धावा पूर्ण

  • जो रुटचे अर्धशतक पूर्ण
  • शमीच्या गोलंदाजीवर मलान ८ धावांवर बाद, रुट अर्धशतकाच्या जवळ
  • इंग्लंडला तिसरा धक्का

  • इंग्लंडच्या १०० धावा पूर्ण, मलान आणि रुट मैदानात
  • मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर जेनिंग ४२ काढून बाद
  • इंग्लंडला दुसरा धक्का, दुसरा सलामीवीर माघारी

  • लंचपर्यंत इंग्लंडच्या १ बाद ८३ धावा, जेनिंग आणि रुट मैदानात

  • १५ व्या षटकात इंग्लंडच्या ५० धावा पूर्ण

  • अश्विनच्या गोलंदाजीवर कुक १३ धावांवर बाद
  • इंग्लंडला पहिला धक्का

  • पाच षटकानंतर इंग्लंडच्या बिनबाद २० धावा
  • अलेस्टर कुक आणि के जेनिंग इंग्लंडचे सलामीवीर मैदानात
  • टॉस जिंकून इंग्लंडचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय