IND vs ENG 4th Test टीम इंडियात तीन बदल, नाणेफेक जिंकून इंग्लंडची प्रथम गोलंदाजी

टीम इंडियासाठी करो की मरो असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याला एडबॅस्टन येथे सुरुवात झाली आहे. दुखातपींनी ग्रासलेल्या टीम इंडियात या सामन्यासाठी तीन बदल करण्यात आले आहेत. साई सुदर्शन, शार्दूल ठाकूर व अंशूल कंबोज यांचा समावेश करण्यात आला आहे.

अंशूल कंबोज याचा हा पहिला आंतरराष्टीय सामना आहे. हरयाणाच्या रणजी संघाकडून खेळणाऱ्या अंशूलने रणजी करंडक स्पर्धेत एका डावात 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो.

 

नाणेफेक जिंकत इंग्लंडची गोलंदाजी

दरम्यान या इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शुभमन गिलने सलग चौथ्या सामन्यात टॉस गमावला.