IND vs ENG – नाणेफेकीच्या कौलनं गिलला पाचव्यांदा दिली हूल; हिंदुस्थानची प्रथम बॅटिंग, बुमराहसह 4 खेळाडू संघाबाहेर

हिंदुस्थान आणि इंग्लंडमधील अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना गुरुवारपासून ओव्हल मैदानावर सुरू झाला. हिंदुस्थानचा कर्णधार शुभमन गिलने सलग पाचव्या लढतीत नाणेफेकीचा कौल गमावला. या लढतीत इंग्लंडचा हंगामी कर्णधार ओली पोप याने नाणेफेक जिंकून प्रथम हिंदुस्थानला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. मालिकेत 2-1 अशा पिछाडीवर असलेल्या हिंदुस्थानचा हा सामना जिंकून बरोबरी साधण्याचा प्रयत्न असेल.

इंग्लंडविरुद्धच्या निर्णयाक लढतीत हिंदुस्थानने संघात 4 बदलही केले आहेत. जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, शार्दूल ठाकूर आणि अंशुल कंबोज हे चार खेळाडू संघाबाहेर गेले आहेत, तर त्यांच्या जागी आकाश दीप, ध्रुव जुरेल, करुण नायर आणि प्रसिध कृष्णा यांची वर्णी लागली आहे.

इंग्लंडच्या संघातही 4 बदल

मँचेस्टर कसोटी अनिर्णित राखण्यात हिंदुस्थानला यश आले होते. या कसोटीत इंग्लंडच्या संघाची चांगलीच दमछाक झाली होती. त्याचा थेट परिणाम इंग्लंडच्या अंतिम 11 खेळाडूंवरही झाला असून काही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. कर्णधार बेन स्टोक्ससह ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर आणि लियान डॉसन यांना विश्रांती देण्यात आली असून त्यांच्या जागी जॅकप बेथेल, गस एटकिंसन, जेमी ओवरटन आणि जोश टंग यांना संधी देण्यात आली आहे.

पाचव्या कसोटीसाठी हिंदुस्थानचा संघ –

केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), करुण नायर, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा

शुभमन गिलची गंभीरसाठी बॅटिंग

इंग्लंडचा संघ –

ऑली पोप (कर्णधार), जॅक क्रॉली, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), क्रिस वोक्स, गस अ‍ॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग

Ind Vs Eng – लढत चिडक्या बिब्ब्यांशी!