अलास्कामध्ये ट्रम्प-पुतीन यांची भेट आणि चर्चा, हिंदुस्थानने दिली प्रतिक्रिया

हिंदुस्थानने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात अलास्कामध्ये होणाऱ्या शिखर परिषदेचे स्वागत केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, ही भेट युक्रेनमधील चालू संघर्ष संपवण्यासाठी आणि शांततेची शक्यता निर्माण करण्यासाठी आशादायक आहे.

रणधीर जयस्वाल पुढे म्हणाले की, सध्या संपूर्ण जग युक्रेन युद्धाकडे पाहत आहे आणि हा संघर्ष लवकरात लवकर संपावा, अशी सर्वांची इच्छा आहे. जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, हिंदुस्थानने नेहमीच धोरण असे राहिले आहे की, युद्ध हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही. त्यांनी पुनरुच्चार केला की, संवाद आणि परस्पर समंजसपणा हे शांततेचे सर्वात मोठे साधन आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील अलास्कामध्ये झालेल्या शिखर परिषदेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची थेट भेट होण्याची ही पहिलीच वेळ होती. असं असलं तरी या बैठकीत सध्या कोणताही मोठा करार झालेला नाही.