
जपानमधील टोकियो शहरात ऑलिम्पिक नुकतेच पार पडले. कोरोनाच्या काळातही हे ऑलिम्पिक यशस्वीपणे आयोजित करण्यात आले हे विशेष. आता पॅरिस (2024), लॉस एंजिलिस (2028) व ब्रिस्बेन (2032) या तीन ऑलिम्पिकचे वेध लागू लागले. याच पार्श्वभूमीवर हिंदुस्थानही ऑलिम्पिक आयोजनासाठी इच्छुक असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे प्रमुख थॉमस बाक यांनी बुधवारी दिली.
थॉमस बाक यांनी ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटले की, हिंदुस्थान, इंडोनेशिया, जर्मनी व कतार यांसारखे देश ऑलिम्पिक आयोजनासाठी इच्छुक आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती 2036, 2040, 2044 सालांमध्ये होणाऱया ऑलिम्पिक स्थळांचा विचार आतापासूनच करीत आहे. हिंदुस्थानकडून 2036 सालापासून प्रत्येक ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी मागणी करण्यात आलेली आहे, असेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
आयोजनाची इच्छा व्यक्त केली
हिंदुस्थान ऑलिम्पिक असोसिएशनचे जनरल सेव्रेटरी राजीव मेहता यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की, टोकियो ऑलिम्पिकआधी झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशन कमिशनच्या व्हिडीओ का@न्फरन्समध्ये हिंदुस्थान 2036 पासून पुढील ऑलिम्पिक आयोजनासाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. दरम्यान, याआधी हिंदुस्थानने 2032 सालातील ऑलिम्पिक व 2030 सालातील आशियाई गेम्स व 2026 सालातील युथ ऑलिम्पिक आयोजनासाठी पंबर कसली होती. पण 2032 सालातील ऑलिम्पिक आयोजनाचा मान ब्रिस्बेनला तर 2030 व 2034 सालांतील आशियाई गेम्सच्या आयोजनाचा मान अनुक्रमे कतार व रियाधला मिळाला.
शतकी स्वातंत्र्य महोत्सव ऑलिम्पिकने साजरा करायचाय
हिंदुस्थानात दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येतो. 2047 साली हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे पूर्ण होतील. या धर्तीवर 2048 साली होणाऱया ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी हिंदुस्थानने तयार रहायला हवे, असे वक्तव्य दिल्लीतील मंत्री मनीष सिसोदिया यांनी या वर्षी मार्च महिन्यात केले होते. एपूणच काय तर शतकी स्वातंत्र्य महोत्सव ऑलिम्पिकने साजरा करण्याची इच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.




























































