हनी ट्रॅप रोखण्यासाठी लष्कराचे नवे सॉफ्टवेअर

हिंदुस्थानची संवेदनशील माहिती काढण्यासाठी चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांकडून हिंदुस्थानी जवानांना हनी ट्रॅपमध्ये अडकवले जाते, परंतु आता हिंदुस्थानी लष्कराने जवानांना यापासून दूर ठेवण्यासाठी एक नवीन सॉफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअरचे नाव एमशिल्ड 2.0 असे आहे. या सॉफ्टवेअरमुळे जवानांकडून चुकूनही कोणतीही माहिती लीक होणार नाही. हे ऑप्लिकेशन केवळ जवान डाऊनलोड करू शकतात. जवानांच्या सर्व हालचालींवर अधिकाऱयांची नजर असणार आहे. या अॅपमुळे जवानांनी कोणकोणते ऑप्लिकेशन डाऊनलोड केले आहे याची माहिती समजू शकणार आहे. या एमशिल्ड 2.0 मुळे समजू शकेल. या ऑप्लिकेशनला डाऊनलोड केल्यानंतर आतापर्यंत कोणताही जवान हनी ट्रॅपमध्ये अडकला नाही, असे एका लष्कर अधिकाऱ्याने सांगितले.

हनी ट्रॅप म्हणजे काय?

जवानाच्या सोशल मीडियावरील पोस्टला एक एक तरुणी किंवा सुंदर महिला लाईक करते. पोस्टला लाईक केल्यानंतर काही वेळ चर्चा होते. त्यानंतर ती महिला जवानाकडे लष्करातील बंदूक, टँक आणि विमानाचा फोटो मागते. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप चॅट आणि मेसेजवर बोलणे सुरू होते. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या जवानांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून देशाची संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी दबाव टाकतात.

हे अ‍ॅप फक्त जवानांसाठी

या मोबाईल ऑप्लिकेशनचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ लष्कराच्या जवानांसाठी बनवण्यात आले आहे. याला अन्य दुसरे कोणीही डाऊनलोड करू शकत नाही. चुपून कोणताही जवान हनी ट्रॅपमध्ये अडकला जाऊ नये, हा या ऑप्लिकेशन मागचा उद्देश आहे. या मोबाईल अ‍ॅपला लष्कराने तयार केले आहे. हे मोबाईल अ‍ॅप आमच्या रोमियो फोर्समधील वापरासाठी बनवण्यात आले आहे. यामागचा उद्देश म्हणजेच हे ऑप्लिकेशनला पेन आर्मीत इंडक्ट करणे होय, असे कॅप्टन शिवानी तिवारी यांनी सांगितले.