… तर चिनी माकडांच्या छाताडावर गोळ्या घाला, सैन्याच्या नियमात महत्त्वपूर्ण बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
galwan-valley

गलवान खोऱ्यात चिनी सैन्याकडून झालेल्या हल्ल्यानंतर आता हिंदुस्थानी सैन्याने आपल्या नियमांत बदल केले आहेत. जर शत्रुकडून शस्त्रसंधींच्या आडून जर कारस्थान झालं तर हिंदुस्थानी सैन्य त्याला चोख प्रत्युत्तर देऊ शकणार आहे.

15 जून रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यानजीक चिनी सैन्याने हिंदुस्थानी सैन्यावर क्रूर हल्ला केला होता. त्यावेळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक सैन्याला हत्यार उचलण्यावर प्रतिबंध घालणारा नियम अस्तित्वात होता. पण, चिनी सैन्याच्या हल्ल्यानंतर या नियमात बदल करण्यात आला आहे. हिंदुस्थानी सैन्याच्या रूल ऑफ एंगेजमेंटमध्ये काही महत्त्वपू्र्ण बदल करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ जर शत्रुराष्ट्राकडून हल्ला झाला तर तिथले फिल्ड कमांडर त्यांना गोळीबाराने प्रत्युत्तर देऊ शकणार आहेत. तसंच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिस्थितीनुरूप निर्णय घेण्याचे अधिकारही त्यांना देण्यात आले आहेत.

हिंदुस्थान-चीन सीमेवर शांतता राखण्यासाठी आणि चिथावणीनंतर होणाऱ्या हल्ल्यांना रोखण्यासाठी दोन्ही देशांमध्ये एक तह झाला आहे. या तहांतर्गत एलएसी म्हणजेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक गोळीबार करण्यास मनाई आहे. एलएसीच्या दोन्ही बाजूला दोन किलोमीटर परिसरात कोणत्याही प्रकारचा स्फोट करणं, बंदूक किंवा विस्फोटकांचा वापर दोन्ही राष्ट्रांकडून करण्यात येणार नाही, असा तो नियम होता. मात्र, तो आता बदलण्यात आला आहे.

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात 15 जून हिंसक संघर्ष झाला. त्यात हिंदुस्थानी लष्कराचे 20 जवान शहीद झाले. हिंदुस्थानी जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले, त्यात 43 चिनी सैनिक ठार झाले.