जम्मूत अखनूरमध्ये हिंदुस्थानचा पाकिस्तानच्या चौक्यांवर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जम्मू

जम्मूमधील अखनूरच्या केरी बट्टल सेक्टरमध्ये हिंदुस्थानी जवानांनी पाकिस्तानी सैनिकांना चोख प्रत्युत्तर दिले. हिंदुस्थानी जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेला गोळीबार, तोफगोळ्यानी केलेल्या हल्ल्यात सीमेलगतच्या पाकिस्तानच्या तीन- चार चौक्यांचे मोठे नुकसान झाले. शिवाय यामध्ये काही पाकिस्तानी सैनिकही ठार झाल्याची माहिती आहे, परंतु याला अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही.

रविवारी सायंकाळी 6.30 वा. केरी बट्टल सेक्टरमध्ये अचानक पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला. यावेळी पाकडय़ांनी सीमेवरील हिंदुस्थानच्या मुख्य चौक्या आणि नागरी वस्त्यांनाही लक्ष्य केले. याला चोख प्रत्युत्तर देताना हिंदुस्थानी जवानांनी पाकच्या तीन ते चार चौक्यांचे मोठे नुकसान केले. यामध्ये या चौक्या जवळजवळ उद्ध्वस्त झाल्या.