
जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात बलाढ्य हिंदुस्थानी हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. अमेरिकेकडून खरेदी करण्यात आलेल्या सहा अपाचे AH-64E अटॅक हेलिकॉप्टर्सची शेवटची तुकडी या महिन्यात हिंदुस्थानात येणार आहे. Flying Tank या नावाने ओळखले जाणारे हे हेलिकॉप्टर्स जगातील सर्वात शक्तिशाली अटॅक हेलिकॉप्टर्सपैकी एक आहेत. शेवटच्या तुकडीतील हे तीनही हेलिकॉप्टर्स जोधपूरमध्ये तैनात केले जातील. यामुळे पाकिस्तानला लागून असलेल्या पश्चिम सीमेवरील सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार आहे.
हिंदुस्थानी सैन्यासाठी सहा अपाचे हेलिकॉप्टर्सचा सुमारे 5 हजार 691कोटी रुपयांचा करार आहे. या करार फेब्रुवारी 2020 मध्ये अमेरिकेसोबत करण्यात आला होता. ही सर्व हेलिकॉप्टर्स 2024 पर्यंत हिंदुस्थानात येणे अपेक्षित होते. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे विलंब झाला. या हॅलिकॉप्टरची पहिली बॅच (तीन हेलिकॉप्टर्स) जुलै 2025 मध्ये अमेरिकेच्या वाहतूक विमानाने हिंडन एअरबेसवर पोहोचली होती.
आता उर्वरीत तीन अपाचे हेलिकॉप्टर्स हे डिसेंबर 2025 मध्ये हिंदुस्थानात येण्याची अपेक्षा आहे. या हॅलिकॉप्टर्सची जोडणी (assembly) आणि तपासणी (Inspection) पूर्ण झाल्यावर त्यांना जोधपूरला पाठवले जाईल. अपाचेमधील मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स सिस्टममुळे अपाचे AH-64E जगातील सर्वात प्रगत लढाऊ हेलिकॉप्टर मानला जातो. अमेरिकेने 1991 मध्ये आखाती युद्धादरम्यान इराकविरोधात आणि अफगानिस्तानमधील तालिबानविरोधातील युद्धात वापर केला. आता हिंदुस्थान अपाचे वापरणारा जगातील 14 वां देश आहे.
मे 2025 मध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) ची घोषणा केली होती. या कारवाईत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले करण्यात आले. या ऑपरेशनमुळे पश्चिम सीमेवर शक्तिशाली हवाई फायरर्टसी गरज असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अपाचे हेलिकॉप्टर्स अशा युद्धांमध्ये (High-Intensity Conflict) गेम चेंजर ठरतील. हे हॅलिकॉप्टर अंधारातही शत्रुंना नेस्तनाबूत करण्यास सक्षम आहेत.
अपाचेची वैशिष्ट्ये काय?
- AH-64E अपाचे हेलिकॉप्टर हा 16 फूट उंच आणि 18 फूट रुंद आहे.
- अपाचे हेलिकॉप्टरला उडवण्यासाठी दोन वैमानिकांची गरज असते. तसेच त्याच्या मोठ्या पंखांना चालवण्यासाठी दोन इंजिन असतता.
- या हेलिकॉप्टरचा वेग 280 किलोमीटर प्रती तास इतका जास्त असून त्याची फ्लाइंग रेंज जवळपास 550 किलोमीटर इतकी आहे.
- अपाचे हेलिकॉप्टरच्या डिझाईनमुळे याला रडारवर पकडणे कठीण असते.
- AH-64E अपाचे हेलिकॉप्टरमध्ये 16 अँटी टँक मिसाईल सोडण्याची क्षमता आहे.

























































