
माऊंट एव्हरेस्टवरून पडून एकाचा मृत्यू झाला आहे. सुब्रता घोष (45) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी होते. सुब्रता हे माऊंट एव्हरेस्टच्या 8,848 मीटर उंचीवर पोहोचले होते. परंतु, अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. हिलेरी स्टेप माऊंट एव्हरेस्टच्या अगदी उंचावर आहे. याला डेथ झोन असेही म्हटले जाते. 26,250 फूट उंचीवर हिलेरी स्टेप आहे. रात्री दोनच्या सुमारास सुब्रता हे आपल्या गाईड सोबत माऊंट एव्हरेस्टवर जात होते. गाईडने त्यांना खाली उतरण्याचा सल्ला दिला. परंतु, त्यांनी याला नकार दिला आणि अचानक खाली पडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.