देशात अघोषित आणीबाणी,माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची सरकारवर टीका

289

देशात सध्या जी काही परिस्थिती आहे ती एकप्रकारे अघोषित आणीबाणीच आहे. माजी अर्थमंत्री चिदंबरम हे सध्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांची जशी चौकशी करण्यात आली.तशीच चौकशी माझ्या कार्यकालात मी घेतलेल्या निर्णयांबाबतही केली गेली. चिदंबरम यांच्याप्रमाणेच उद्या माझेही स्वातंत्र्य हिरावून घेतले जाऊ शकते. हे लक्षात घेता देशात सध्या अघोषित आणीबाणीची परिस्थिती आहे. अशा शब्दांत माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी सरकारवर टीका केली आहे. एनसीपीए थिएटरमध्ये रविवारी आयोजित मुंबई लिटरेचर फेस्टीव्हलमध्ये त्यांनी दिलेल्या मुलाखतीत आपले विचार मांडले.

आयोध्याच्या निकालात त्रुटी

आयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्यात अनेक त्रुटी आहेत. परंतु,हा निकाल मुस्लिम समाजाने मान्य करावा.कारण, हाच निकाल सर्वोच्च आहे असेही सिन्हा यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय चुकीचा असून त्यात अनेक त्रुटी असल्याचे ते म्हणाले.

सीतारामन यांच्या अर्थसंकल्पातील आकडे फसवे

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प पूर्णपणे चुकीचा असून त्यातील आकडेही फसवे आहेत. असा आरोपही यशवंत सिन्हा यांनी केला. यंदाच्या फेब्रुवारीत सादर केल्या गेलेल्या अंतरिम अर्थसंकल्पातील आकडेच गृहीत धरण्यात आले. महालेखापरीक्षकांनी 5 जुलैपर्यंतचा सुधारित अंदाज मांडला होता. त्यामुळे सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील आकडे फसवे असल्याचे सिन्हा यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या