हिंदुस्थानी कर्मचारी हे त्यांच्या बॉसपेक्षा चांगलं काम करतात, सर्वेक्षणातून उघड

996

सर्वसाधारणतः ऑफिसमधला बॉस म्हणजे सगळ्यांचाच चर्चेचा विषय. विक्रम-वेताळातल्या कथेप्रमाणे कधी मानगुटीवर बसणारा, एखाद्या खाष्ट सासूप्रमाणे छळ करणारा तर कधी ब्रह्मराक्षसासारखा मागे लागणारा अशा नानाविध उपाधी त्याला मिळत असतात. त्याच्या दराऱ्यामुळे बऱ्याचदा कर्मचाऱ्यांचं ‘मांजर’ झालेलं असतं. तर अशा तमाम बॉसपीडित कर्मचाऱ्यांसाठीच ही बातमी आहे.

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, 95 टक्के हिंदुस्थानी कर्मचारी हे त्यांच्या बॉसपेक्षा उत्तम काम करतात. जगातील सर्वोत्तम प्रकारच्या सरासरी दहा कर्मचाऱ्यांमध्ये सात कर्मचारी हे हिंदुस्थानी असतात. यात मिलेनियअल्स (नवतरुण)ची संख्या 73 टक्के तर जेन-झेड (90च्या दशकाच्या मध्यापासून ते सन 2000 पर्यंतची पिढी)ची संख्या 70 टक्के इतकी आहे. अमेरिकेत हीच सरासरी 59 टक्क्यांवर आलेली आहे.

हिंदुस्थानी कर्मचाऱ्यांमध्ये पराकोटीचा आत्मविश्वास असतो. तसंच कामाप्रति समर्पित असतात तसेच कामाच्या ठिकाणी दिवसातले जास्तीत जास्त तास घालवतात. त्यामुळे कामाची रचना, त्यातले बारकावे आणि आव्हानं यांना ते सामोरे जाऊ शकतात, असं या सर्वेक्षणातून उघड झालं आहे. हे सर्वेक्षण क्रोनोस येथील द ग्लोबल स्टेट्स मॅनेजर या संस्थेतर्फे करण्यात आला होता. कर्मचाऱ्यांच्या कार्यामुळे हिंदुस्थानी कार्यालयांमधील क्रयशक्ती अतिशय मजबूत असल्याचं या सर्वेक्षणातून उघड झालं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या