
अभियंता होण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. अभियंता झाल्यानंतर चांगली नोकरी मिळाल्यानंतरही एका अवलियाने ती सोडून रस्त्यावर झाडू मारायचे काम हाती घेतले आहे. ही गोष्ट आहे रशियात गेलेल्या 17 हिंदुस्थानी कामगारांची. सेंट पीटर्सबर्ग शहरात हे कामगार रस्ते झाडत आहेत. या कामगारांमध्ये मुकेश मंडल या आयटी अभियंत्याचेही नाव आहे. मायक्रोसॉफ्टसारख्या कंपनीमध्ये काम केल्याचे तो सांगतो. पण, रशियामध्ये तो काही महिन्यांसाठी गेला आहे. तेथे त्याला तब्बल 1 लाख रुपये दरमहा पगार दिला जात आहे. रशियात राहणे आणि खाण्यापिण्याची व्यवस्था कंपनीनेच केली आहे. या गटामध्ये चालक, आर्किटेक्ट तसेच इतर कौशल्ये असलेलेदेखील आहेत.


























































