
सामना प्रतिनिधी । मुंबई
नासाच्या 2019च्या वार्षिक कॅलेंडरमध्ये हिंदुस्थानच्या मुलांनी मानाचे स्थान पटकावले आहे. कॅलेंडरच्या कव्हर पेजवर उत्तर प्रदेशातील दीपशिखा या विद्यार्थिनीने काढलेले चित्र असून कॅलेंडरमध्ये महाराष्ट्रातील दोघांच्या चित्रांचा समावेश आहे.कर्मशियल क्रू कार्यक्रमाअंतर्गत नासाने नवर्षासाठी कॅलेंडर लाँच केले आहे. यातील सर्व चित्रे लहान मुलांनी रेखाटली आहेत. अंतराळ स्थानकात राहणाऱ्या अंतराळकीरांचं आयुष्य, त्यांचं काम मुलांपर्यंत पोहोचाकवं, या उद्देशाने कॅलेंडरची निर्मिती करण्यात आल्याची माहिती नासाकडून देण्यात आली आहे.
अवकाशातील जीवन हा यंदाच्या कॅलेंडरचा विषय होता. अंतराळातील वैज्ञानिक आश्चर्यांकडे पाहणाऱया मुलीचे चित्र कव्हर पेजवर असून ते उत्तर प्रदेशातील नऊ वर्षांच्या दीपशिखाने रेखाटले आहे. याशिवाय या कॅलेंडरमध्ये आणखी तीन हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची चित्रे आहेत. यातील दोघे जण महाराष्ट्राचे आहेत. राज्यातील 10 कर्षांच्या इंद्रयुद्ध आणि 8 वर्षांच्या श्रीहन यांनी एकत्रितपणे तयार केलेलं चित्र अंतराळवीरांचं आयुष्य आणि यावरील चित्र या कॅलेंडरमध्ये आहे.
तामीळनाडूत राहणाऱया 12 वर्षांच्या थेमुकिलिमनच्या कलाकृतीलादेखील कॅलेंडरमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याने रेखाटलेले चित्र अंतराळातील खाद्य यावर आधारित आहे. कॅलेंडरमध्ये स्थान देण्यात आलेली चित्रे अंतराळ विज्ञानाशी नाते सांगणारी आहेत, असे नासाने प्रसिद्धीपत्रात म्हटलं आहे. त्यासाठी नासाने चित्रकला स्पर्धा घेतली होती.




























































