
हिंदुस्थानी नौदल लागोपाठ आपली अंडरवॉटर क्षमता मजबूत करत आहे. देशातील पहिले स्वदेशी डिझाइन असलेले डायविंग सपोर्ट क्राफ्ट ‘डीएससी ए20’ हे जहाज आज कोची नौदल बेसच्या ताफ्यात सामील करण्यात आले. हे जहाज ‘आत्मनिर्भर भारत’अंतर्गत बनवल्या जाणाऱया पाच डायविंग सपोर्ट क्राफ्ट्समधील पहिले जहाज आहे. ‘डीएससी ए20’च्या कमिशनिंगला हिंदुस्थानी नौदलाच्या समुद्री सुरक्षा आणि अंडरवॉटर युद्ध क्षमतेला मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. हे जहाज समुद्रात जहाजाची दुरुस्ती, बचाव आणि विशेष मोहिमेसाठी मदत करेल.































































