रामनाथन यांना जिओ सायन्सचा नोबेल, रामनाथन यांना जिओ सायन्सचा नोबेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मूळचे हिंदुस्थानी वंशाचे जलवायू वैज्ञानिक वीरभद्रन रामनाथन यांना ‘रॉयल स्वीडिश अॅकेडमी ऑफ साइंसेज’ने प्रतिष्ठsचा भू-विज्ञानमध्ये 2026 चा क्रॅफर्ड पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. या पुरस्काराला भू-विज्ञानचा नोबेल पुरस्कार म्हटले जाते. रामनाथन यांनी ग्लोबल वार्मिंग समजण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. 82 वर्षीय रामनाथन यांनी 1975 मध्ये नासात काम करत असताना पृथ्वीचे तापमान का वाढते याचा शोध लावला होता. क्लोरोफ्लोरोकार्बन जो एरोसोल आणि रेफ्रिजरेशनमध्ये व्यापक रूपाने वापर केला जात होता. वायूमंडलमध्ये कार्बन डायऑक्साइडच्या तुलनेत 10 हजार पट अधिक प्रभावीपणे गर्मी खेचतात. ग्लोबल वार्ंमग ही कार्बन डाइऑक्साइडमुळे होते, हे रामनाथन यांनी 1975 साली सांगितले होते. रामनाथन यांचा जन्म मदुराई येथे झाला. त्यांचे बालपण हे चेन्नईत गेले. त्यांनी आपल्या करीअरची सुरुवात सिकंदराबादमध्ये एका फ्रीजच्या फॅक्टरीत इंजिनीअर म्हणून केली. या ठिकाणी त्यांनी सर्वात आधी सीएफसीवर काम केले.

क्रॅफर्ड पुरस्कारांतर्गत रामनाथन यांना जवळपास 9 लाख अमेरिकन डॉलरची रक्कम दिली जाणार आहे. यासोबत एक सुवर्ण पदक देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. या पुरस्काराचे वितरण मे 2026 मध्ये स्टॉकहोमध्ये आयोजित एका कार्यक्रमात केले जाईल.