
व्हाईट हाऊसवर भाडय़ाने घेतलेल्या ट्रकद्वारे हल्ला करणाऱया साई वर्षिथ कुंदला या 20 वर्षीय हिंदुस्थानी तरुणाला 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. 22 मे 2023 रोजी ही घटना घडली होती. हल्ल्यावेळी तो 19 वर्षांचा होता. कुंदला याच्यावर नाझी विचारधारेचा प्रभाव असून त्याला लोकशाही पद्धतीने आलेले सरकार उलथवून हुकूमशाही सरकार आणायचे होते, असे उघड होत असल्याचे न्याय विभागाने म्हटले आहे. त्याला जो बायडेन यांची हत्या घडवून आणायची होती.





























































