राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दलाकडून काहीतरी शिका!

409
pm-modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दलाचे कौतुक केले. या दोन्ही पक्षांचे खासदार कधीच वेलमध्ये उतरत नाहीत. त्यांच्याकडून काहीतरी शिका, असा सल्ला मोदी यांनी सर्वपक्षीय खासदारांना दिला.

राज्यसभेच्या ऐतिहासिक 250 व्या अधिवेशनाला पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी संबोधित केले. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असून देशाच्या संघराज्यीय रचनेचा आत्मा आहे. जेक्हा आम्ही विरोधी पक्षात होतो, तेव्हाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दल हे दोन्ही पक्ष काम करत होते. मात्र, या दोन पक्षांनी सभागृहात अडथळे निर्माण करण्यापेक्षा आपण संवादाचा मार्ग अवलंबला पाहिजे. या बाबतीत एक चांगला आदर्श घालून दिला असल्याचे ते म्हणाले.

एनसीपी, बीजेडी या दोन्ही पक्षांनी परस्परांमध्ये ठरवले होते की, कोणतेही मुद्दे असले तरी गोंधळ घालण्यासाठी वेलमध्ये जायचे नाही. त्यांनी गोंधळ घातला नाही तरीसुद्धा त्यांच्या राजकीय वाटचालीत कोणताही अडथळा आला नसल्याचे मोदी यांनी सांगितले.

अडथळय़ांऐवजी संवादाचा मार्ग निवडा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दलाचे कौतुक केले. या दोन्ही पक्षांचे खासदार कधीच वेलमध्ये उतरत नाहीत. त्यांच्याकडून काहीतरी शिका, असा सल्ला मोदी यांनी सर्वपक्षीय खासदारांना दिला.

राज्यसभेच्या ऐतिहासिक 250 व्या अधिवेशनाला पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी संबोधित केले. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असून देशाच्या संघराज्यीय रचनेचा आत्मा आहे. जेक्हा आम्ही विरोधी पक्षात होतो, तेक्हाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दल हे दोन्ही पक्ष काम करत होते. मात्र, या दोन पक्षांनी सभागृहात अडथळे निर्माण करण्यापेक्षा आपण संवादाचा मार्ग अवलंबला पाहिजे. या बाबतीत एक चांगला आदर्श घालून दिला असल्याचे ते म्हणाले.

एनसीपी, बीजेडी या दोन्ही पक्षांनी परस्परांमध्ये ठरवले होते की, कोणतेही मुद्दे असले तरी गोंधळ घालण्यासाठी वेलमध्ये जायचे नाही. त्यांनी गोंधळ घातला नाही तरीसुद्धा त्यांच्या राजकीय वाटचालीत कोणताही अडथळा आला नसल्याचे मोदी यांनी सांगितले.

सभागृह हे संवादासाठी असले पाहिजे. या ठिकाणी  वादविवाद झाले तरी अडथळ्यांऐकजी संवादाचा मार्ग निवडायला हवा. राज्यसभा काळानुसार स्व:ला जुळवून घेत आहे. काळ बदलला, परिस्थिती बदलत गेली आणि या सभागृहाने बदलत्या परिस्थितीला आत्मसात करून स्वत:ला त्या परिस्थितीशी जुळवून घेतले. आज या महत्वाच्या क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली हे मी भाग्य समजतो, असेही मोदी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या