जर्मनीतील पाकिस्तानी दूतावासासमोर हिंदु्स्थानींची निदर्शने

814

जम्मू-कश्मीर मुद्द्याबरोबरच आता 370 कलमावरुन पाकिस्तानने हिंदुस्थानच्या कुरापत्या काढण्यास सुरुवात केली आहे. एकवेळच्या अन्नाची भ्रांत असलेला पाकिस्तान हिंदुस्थानवर हल्ला करण्याच्याही फुशारक्या मारत आहे. याचपार्श्वभूमीवर जर्मनीतील पाकिस्तानी दूतावासासमोर अनेक हिंदुस्थानी नागरिकांनी एकत्र येत पाकिस्तानविरोधी जोरदार निदर्शने केली. विशेष म्हणजे यावेळी बलुचिस्तानमधील नागरिकही या निदर्शनात सामील झाले होते. त्यांनीही पाकिस्तान बलुचिस्तानमधील नागरिकांवर अन्याय करत असल्याचे सांगत पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

तसेच अमेरिका आणि इतर देशांकडे भीक मागून देश चालवणाऱ्या पाकिस्तानने हिंदुस्थानच्या वाटेला जाऊ नये , नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील. असा इशाराही हिंदुस्थानी नागरिकांनी यावेळी दिला. त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये हिंदू तरुणींचे जबरदस्तीने धर्मांतरण करणाऱ्या पाकिस्तानचा यावेळी निषेध कऱण्यात आला. बलुचिस्तानमधील नागरिकांनीही यावेळी पाकिस्तानमध्ये त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल सांगितले. तसेच पाकिस्तानच दहशतवादाला पोसतो असेही या नागरिकाने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या