प्रवाशांनो, आत्ताच तिकीट बुक करा! रेल्वेने आणली भन्नाट ऑफर, तिकीटांवर मिळवा 20 टक्के सूट

प्रातिनिधीक फोटो

सणउत्सवाचे दिवस सुरू असून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. प्रत्येकजण सणासुदीला लांबच्या प्रवासाला निघतात. त्यामुळे गाड्यांचे बुकींग नेहमीच फुल असतात. सणउत्सवाला जाण्यासाठी प्रवाशांना 2 ते 3 महिने आधींच बुकिंग करावे लागते. याशिवाय प्रवासी वाहनांचे भाडेही दुप्पट वाढते. यातून वाचण्यासाठी आणि प्रवास सुखकर होण्यासाठी भारतीय रेल्वेने एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचा प्रवाशांना नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.

सणासुदीला गावी निघालेल्या प्रवाशांच्या खिशाला तिकीटे परवडणारी नसतात. तिकीट बुक झाले तरी गावाहून परतताना मात्र, उभ्याने प्रवास करावा लागतो. प्रवाशांचा हा त्रास कमी करण्यासाठी रेल्वेने एक नवीन योजना सुरू केली आहे. ‘राउंड ट्रिप पॅकेज फॉर फेस्टिव्हल रश’ असे या योजनेचे नाव आहे. या योजनेचा फायदा घेतला तर प्रवाशांना प्रवास सुखकर होण्याची शक्यता आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये आता डिजिटल सुविधा; फेस स्कॅनने खाते उघडणार, पैसेही ट्रान्सफर होणार

Round Trip Package For Festival म्हणजे नेमकं काय?

रेल्वेने सुरू केलेल्या या योजनेत एखाद्या प्रवाशाने जाण्याचे आणि परतीच्या प्रवासाचे दोन्ही तिकिटे एकदाच बुक केली तर, परतीच्या प्रवासाच्या मूळ भाड्यावर 20 टक्के सूट दिली जाईल.

यामध्ये येणारा आणि जाणारा व्यक्ती एकच असणे गरजेचे आहे. तसेच दोन्ही तिकीटे एकाच क्लासची आणि एकाच मार्गावरील असणे आवश्यक आहे.

जाण्याचे तिकीट – 13 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यानच्या प्रवासासाठी असावे. तर, परतीचे तिकीट 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 दरम्यानचे असावे.

एकदा तिकीटाचे बुकिंग झाले की तिकिटात कोणतेही बदल करता येणार नाहीत.

रेल्वेने दिलेल्या 20 टक्के सूट व्यतीरिक्त इतर कोणतीही सूट, व्हाउचर, पास, किंवा रेल्वे प्रवास कूपन लागू होणार नाही.

गृह कर्ज, वाहन कर्ज स्वस्त होणार नाही; रेपो रेट जैसे थे