आशियाई स्पर्धेसाठी हिंदुस्थानी सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

हिंदुस्थानचा फुटबॉल संघ यूएईमध्ये होणाऱ्या एएफसी आशियाई स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. संघाच्या किटचे बुधवारी अनावरण करण्यात आले. यावेळी सुनील छेत्री म्हणाला, खेळाडूंच्या मेहनतीमुळेच आम्हाला या स्पर्धेसाठी पात्र होता आले. आगामी स्पर्धेत थायलंड, युएई व बहरीन या तिन्ही बलाढय़ संघांचा सामना करावयाचा आहे. आमची तयारी चांगली झालीय.