Tokyo Olympic गुड न्यूज! पुरुषांपाठोपाठ महिला हॉकी संघाचा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश

जपानमध्ये सुरु असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी हिंदुस्थानला गुड न्यूज मिळाली. पुरुषांपाठोपाठ हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ब्रिटनच्या महिला संघाने आयर्लंडचा 2-0 असा पराभव केल्यानंतर हिंदुस्थानच्या महिला संघाला क्वार्टर फायनलचे तिकीट मिळाले.

रानी रामपालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने शनिवारी झालेल्या लढतीत दक्षिण आफ्रिका संघाचा 4-3 असा पराभव केला होता. पाच लढतीत तीन पराभव आणि दोन विजयासह हिंदुस्थानचे 4 अंक झाले होते. क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ब्रिटनच्या संघाने आयर्लंडचा पराभव करणे आवश्यक होते. शनिवारी सायंकाळी झालेल्या लढतीत ब्रिटनने विजय मिळवला आणि हिंदुस्थानच्या संघाने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.

ऑस्ट्रेलियाशी होणार सामना

दरम्यान, साखळी लढतीत ग्रुपमध्ये चौथ्या स्थानावर राहिलेल्या हिंदुस्थानचा क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे.

वंदना कटारियाने रचला इतिहास

दरम्यान, हिंदुस्थानची महिला खेळाडू वंदना कटारिया हिने इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत वंदना कटारिया हिने तीन गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली होती. यासह हिंदुस्थानच्या ऑलिम्पिक इतिहासात एका मॅचमध्ये सर्वाधिक गोलचा विक्रम तिने केला.

Tokyo Olympic सिंधू फायनलच्या रेसमधून बाहेर, आता कांस्यपदकासाठी लढणार

आपली प्रतिक्रिया द्या