
जॉर्जिया देशाने हिंदुस्थानी नागरिकांसाठी व्हिसा धोरण शिथिल केले आहे. यामुळे ज्या हिंदुस्थानी नागरिकांकडे अमेरिका, ब्रिटन, शेंजेन क्षेत्र किंवा जपानमधील आधीच वैध व्हिसा किंवा निवास परवाना आहे अशा नागरिकांना व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. भारतीय पासपोर्टधारकांनी पात्रता निकष पूर्ण केल्यास त्यांना आता वेगळ्या जॉर्जियन व्हिसाची आवश्यकता राहणार नाही.