
हिंदुस्थानातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने 30 नवीन एअरबस ए350 वाइड-बॉडी विमानांसाठी ऑर्डर दिली आहे. या कराराची किंमत 4 ते 5 अब्ज डॉलर्स (सुमारे 40 हजार कोटी रुपये) असल्याचे समजते. कंपनीचे सीईओ पीटर अल्बर्स यांनी ही माहिती दिली. यापूर्वी एप्रिल 2024 मध्ये, इंडिगोने पहिल्यांदा 30 ए 350 विमानांची ऑर्डर दिली होती. आता कंपनीच्या एकूण वाइड बॉडी प्लेन ऑर्डरची संख्या 60 विमानांवर पोहोचली आहे. इंडिगोकडे 430 हून अधिक विमानांचा ताफा आहे.