Indonesia Fire – जकार्तामध्ये सात मजली इमारतीत भीषण आग, 20 जणांचा मृत्यू

इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये सात मजली इमारतीत मंगळवारी भीषण आगीची घटना घडली. या आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले. मृतांमध्ये 5 पुरुष आणि 15 महिलांचा समावेश आहे. मृत महिलांमध्ये एक गर्भवती महिला होती.

या इमारतीत टेरा ड्रोन इंडोनेशियाची कार्यालये होती. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली आणि नंतर ती वरच्या मजल्यांवर पसरली. आग लागली तेव्हा काही कर्मचारी जेवण करत होते, तर काही बाहेर होते. अग्नीशमन दलाकडून इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजले नाही. अग्नीशमन दलाला आग आटोक्यात आणण्यास यश मिळाले आहे.