जयपूर-बंगळुरुच्या विमानात बाळाची तब्येत बिघडली, आपत्कालीन लॅण्डिंग करुनही वाचवण्यात अपयश

air india express

जयपूरच्या बंगळुरुला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात एका बाळाची अचानक तब्येत बिघडली आणि एकच गोंधळ उडाला. त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे पायलटने तत्काळ विमान इंदूरच्या अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लॅण्डिंग करण्यात आले. मात्र अनेक प्रयत्नानंतरही बाळाला वाचविण्यात अपयश आले.

विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या IX-1240 हे विमान सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जयपुरहून रवाना झाली होती. उड्डणादरम्यान एका वर्षाच्या बाळाची तब्येत अचानक बिघडली. त्यावेळी केबिन क्रूने विमानात उपस्थित असलेल्य़ांमध्ये डॉक्टरबाबत अनाऊंसमेण्ट केली. विमानातील एका डॉक्टरने तत्काळ त्या बाळाला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थितीचा अंदाज घेता पायलटने इंदूरच्या विमानतळावर एअर ट्राफिक कंट्रोलशी संपर्क साधून मेडिकल इमरजेन्सी घोषित केली. त्यानंतर विमानाला सायंकाळी 7.50च्या सुमारास इंदूरमध्ये सुरक्षित उतरवण्यात आले. मात्र बाळाचा वाचवण्यात अपयश आले. मोहम्मद अबरार असे बाळाचे नाव असून बाळ आई-बाबा आणि मोठ्या भावासोबत जयपूरहून बंगळुरुला जात होते.