…तसे काही बोललोच नाही! इंदुरीकर महाराजांचा खुलासा

835

ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख-इंदुरीकर यांनी बुधवारी सायंकाळी आरोग्य विभागाकडे खुलासा सादर केला आहे. यामध्ये त्यांनी कीर्तनात केलेले वक्तव्य अमान्य केले आहे. कीर्तनाच्या कार्यक्रमात आपण असे कुठेही बोललेलो नाही असे त्यांनी नोटिशीवरील खुलाशात स्पष्ट केले आहे.

ह.भ.प. इंदुरीकर महाराजांनी आरोग्य विभागाकडे खुलासा सादर केला आहे. जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावल्यानंतर बुधवारी महाराजांच्या वतीने त्यांचे वकील ऍड. पांडुरंग शिवडीकर यांनी खुलासा सादर केला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. कीर्तनाच्या कार्यक्रमातील वक्तव्य त्यांनी अमान्य केले आहे. कीर्तनाच्या कार्यक्रमात आपण असे कुठेही बोललेलो नाही, असे त्यांना खुलाशात स्पष्ट केले आहे.

या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रवीण मुरंबीकर म्हणाले, महाराजांकडून काल खुलासा प्राप्त झालेला आहे. त्यात त्यांनी काय म्हटले आहे याची आम्ही सर्वप्रकारे शहानिशा करीत आहोत. या खुलाशाबाबत कमिटीमध्ये चर्चाही केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या