पाकड्यांचे खायचे-प्यायचे वांदे, पेट्रोल-डिझेलपेक्षा दूध महाग

प्रातिनिधिक फोटो

जम्मू-कश्मीरमधून कलम 370 रद्दबातल झाल्यापासून युद्धाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानात महागाईचा आगडोंब उसळला आहे. पाकिस्तानध्ये टोमॅटोच्या भावाने शतक गाठल्यानंतर आता दुधाचे भावाने शतक पार केले आहे. अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलपेक्षाही दूध महाग मिळत आहे. मोहरमच्या पार्श्वभूमीवर दुधाच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी आपल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.

कराची आणि सिंध प्रांतामध्ये दुधाचा भाव प्रति लिटर 140 रुपयांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी आणि दुधाची किंमत जास्त असा प्रकार येथे पाहायला मिळत आहे. या भागात पेट्रोल 113 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 91 रुपये प्रति लिटर मिळत आहे. मात्र दुधाचा भाव मात्र यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये जीवनाश्यक वस्तुची किंमत वाढल्याने नागरिकांनी इम्रान खान सरकारचा निषेध केला.

याबाबत एका दुकानदाराने सांगितले की, मोहरमच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढल्याने शहरातील अनेक भागात दुधाचा भाव 120 ते 140 प्रति लिटरवर पोहोचला आहे. आयुष्यात दुधाचे एवढे भाव वाढल्याचे मी कधी पाहिले नसल्याचेही त्याने सांगितले. तसेच शहरात अनेक ठिकाणी स्टॉल लावून दूध, ज्यूस आणि थंडगार पाणी विकले जात असल्याचेही तो म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या