
इंस्टाग्रामने अलीकडेच आपल्या युजर्ससाठी नवे फिचर जारी केले आहे. त्यामुळे आता इंस्टाग्राम वापरणे अधिक मजेदार होणार आहे. इंस्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी शेड्युलिंग टूल आणि अचिव्हमेंट्स हे फीचर्स आणले आहेत. त्यामुळे इंस्टाग्रामवरील युजर्स आता शेड्यूलिंग टूल वापरून 75 दिवसांपर्यंत रील, फोटो आणि कॅरोसेल पोस्ट शेड्यूल करू शकतात. हे फीचर इंस्टाग्रामच्या अॅडव्हान्स सेटिंग्जमध्ये उपलब्ध असणार आहे.
यासाठी आता इंस्टाग्राम अचिव्हमेंट्स फीचरची चाचणी करत आहे. या नव्या फिचरद्वारे युजर्सना इतरांसोबत कोलॅब्रेशन करून त्यांच्या फॉलोअर्सना रीलद्वारे गुंतवून ठेवता येणार आहे. तसेच ऑडिओ वापरून ट्रेंड फॉलो करता येणार आहे. याशिवाय इंस्टाग्राम यूजर्सना आता नोटिफिकेशन्स देखील मिळणार आहेत. यासह आपल्या इन्स्टा अकाउंटवरून त्यांनी किती कमावले याची माहिती त्यांना घेता येणार आहे. इतकेच नाही तर ते कोणत्या ट्रेंडिंग रीलद्वारे जास्त पैसे कमवता येऊ शकतात हे कोणत्याही रीलच्या मेनूवर जाऊन पाहता येणार आहे.


























































