विमा पॉलिसी सरेंडरवर केल्यास फायदा

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इर्डा) विमा पॉलिसीशी संबंधित अनेक नियम सोपे केले आहेत. ज्यामुळे पॉलिसीधारकांना दिलासा मिळाला आहे. पॉलिसीधारकांनी पॉलिसी काही अटींसह रद्द किंवा सरेंडर केल्यास त्यांना अनेक फायदे विमा नियामकाने जाहीर केले. इर्डाने सर्व जीवन विमा बचत उत्पादनांमध्ये पॉलिसी कर्ज सुविधा अनिवार्य केली आहे. ज्यामुळे पॉलिसीधारकांना रोख गरजा पूर्ण करण्यास मदत होणार आहे.  जीवन विमा पॉलिसीधारकांनी एक वर्षाच्या कालावधीनंतर पॉलिसी समर्पण केल्यास त्यांना अधिक चांगला परतावा दिला जाणार आहे. इर्डाने आयुर्विमा पॉलिसींबाबतच्या सर्व नियमांबाबतचे ‘मास्टर’ परिपत्रक बुधवारी जारी केले ज्यानुसार ‘फ्री-लूक’ कालावधी आता 30 दिवसांचा असेल जो यापूर्वी 15 दिवसांचा होता. ‘फ्री-लूक’ कालावधी पॉलिसीच्या अटी आणि नियमांचे पुनरावलोकन करण्यासाठी वेळ प्रदान करतो.