विमा कामगार बँकेवर भगवा; विजयी शिलेदार ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरे यांनी केले अभिनंदन

शिवसेना प्रणित विमा कर्मचारी सेनेने शिवसहकार पॅनेलच्या माध्यमातून विमा कामगार को-ऑप. बँकेच्या निवडणुकीत 21 पैकी 21 जागा जिंकत इतिहास घडवला. शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, आमदार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बँकेवर भगवा झेंडा डौलाने फडकवला. सर्व विजयी उमेदवार आणि विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. उद्धव ठाकरे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे काwतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या ऐतिहासिक विजयात भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाचे सरचिटणीस दिनेश बोभाटे, एलआयसी भारतीय विमा कर्मचारी सेनेचे कार्याध्यक्ष गोपाळ शेलार, सरचिटणीस महेश लाड, जीआयसी भारतीय विमा कर्मचारी सेनेचे अध्यक्ष सुरेश नार्वेकर, ओरिएंटल भारतीय विमा कर्मचारी सेनेचे अध्यक्ष संजय शिर्पे, न्यू इंडिया भारतीय विमा कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अजय गोयजी, नॅशनल भारतीय विमा कर्मचारी सेनेचे सरचिटणीस संजय डफळ, युनायटेड भारतीय विमा कर्मचारी सेनेचे सरचिटणीस अजय दळवी, नॅशनल स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस हेमंत सावंत, अनंत वाळके, शरद एक्के, दीपक मोरे, किरण चोरगे यांचा मोलाचा वाटा होता. यावेळी माजी आमदार विलास पोतनीसदेखील उपस्थित होते.