आंतरमुंबई दिव्यांग क्रिकेट ‘अ’ गटात पालघर तर ‘ब’ गटात कल्याण संघ विजेता

मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर दी डिसेबल्ड या संस्थेच्या वतीने 30 वी आंतरमुंबई दिव्यांग क्रिकेट स्पर्धा दादरच्या शिवाजी पार्क येथे झाली. स्पर्धेच्या ‘अ’ गटात पालघर तर ‘ब’ गटात कल्याण संघाने विजेतेपद पटकावले. ‘अ’ गटातील अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना 15 षटकांत 100 धावांचे आव्हान देत रायगड संघाला 60 धावांतच गुंडाळले.

‘मालिकावीर’ म्हणून रवी पाटील, उत्कृष्ट फलंदाज शैलेश, उत्कृष्ट गोलंदाज गणेश पिसाळ, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून रोहन यांना सन्मानित करण्यात आले. ‘ब’ गटातून कल्याण संघाने शेवटच्या चेंडूवर 3 धावा घेत ठाणे संघाला अटीतटीच्या अंतिम लढतीत पराभूत केले. ‘मालिकावीर’ म्हणून जयंत पटेल, उत्कृष्ट फलदाज जयंत पटेल, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मानस तरे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून दिनोद कठोडिया यांना सन्मानित करण्यात आले. ही स्पर्धा एलआयसीने प्रायोजित केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या