आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 ची अंतिम यादी प्रसिद्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक साहित्यविश्वात बुकर पुरस्काराला फार महत्त्व आहे. यंदाच्या वर्षाचा बुकर पुरस्कार कोणाला मिळतो याचे वेध साहित्यजगताला लागले आहेत. नुकतीच आंतरराष्ट्रीय बुकर अवॉर्ड 2026 ची अंतिम यादी जाहीर झाली. या यादीत समाविष्ट पुस्तकांचे वर्णन करताना शतकभराच्या प्रवासातील स्थित्यंतरं मांडणारी पुस्तकं असं वर्णन परीक्षकांनी केले आहे. व्यापक व सखोल विषय मांडणारी ही पुस्तकं जगाच्या विशिष्ट प्रदेशाचं, तिथल्या वैचारिक, सामाजिक संक्रमणाचं प्रतिनिधीत्व करतात. ही सहा पुस्तके विविध आंतरराष्ट्रीय अनुभवांचा वेध घेणारी आणि इतिहासातील अनेक घटनांवर आधारित आहेत. लघुयादीत निवड झालेल्या या पुस्तकांत महिला लेखक-अनुवादकांचे निर्विवाद वर्चस्व जाणवते. भारतीय वंशाच्या कॅनेडियन-अमेरिकन लेखिका पद्मा विश्वनाथन यांनी पोर्तुगीज भाषेतील एका लघुकथेच्या इंग्रजी अनुवादक म्हणून 2026 च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या अंतिम यादीत स्थान मिळवले आहे. त्यांनी केलेल्या ब्राझिलियन लेखिका अॅना पाउला माया यांच्या ‘ऑन अर्थ अॅज इट इज बिनीथ’ या कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाचा या अंतिम यादीत समावेश झाला आहे. या पुरस्काराच्या विजेत्या पुस्तकाची घोषणा 19 मे रोजी लंडन येथे केली जाईल.